Thane news – दंश झालेल्या सापाला घेऊन ‘त्याने’ गाठले सिव्हिल हॉस्पिटल

सर्पदंश झालेल्या रुग्णाने ‘त्या’ सापाला पिशवीत टाकून थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठल्याची थरारक घटना ठाण्यात घडली. त्यानंतर या रुग्णालयाच्या महिला वॉर्डमध्ये भलीमोठी धामण पिशवीतून अचानक बाहेर पडल्याने अनेकांची चांगलीच पळापळ झाली.

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारात असलेल्या सिव्हिल रुग्णालयात सोमवारी सर्पदंश झालेली व्यक्ती उपचारासाठी आली होती. उपचारासाठी येताना त्याने चक्क दंश केलेला सापही एका पिशवीतून सोबत आणला. मात्र अचानक पिशवीतून साप सटकून थेट महिला वॉर्डमध्ये शिरला. यावेळी घाबरलेल्या रुग्ण आणि डॉक्टरांनी आरडाओरडादेखील केला. अचानक भलामोठा साप पाहून महिला रुग्णांची पाचावर धारण बसली.