
एका व्यापाऱ्याला खोट्या गुह्यात अडकवण्याची व अटक करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे 20 हजार रुपयांची खंडणी वसूल करण्याचा प्रकार उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांच्या अंगलट आला असून या दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.
उल्हासनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले बाबासाहेब जाधव व बाळासाहेब चव्हाण या दोन पोलिसांनी 23 व 24 एप्रिल रोजी एका व्यापाऱ्याला ताब्यात घेऊन अटक करण्याची धमकी दिली. आणि अटक न करण्याच्या बदल्यात त्याच्याकडे 20 हजार रुपयाची खंडणी मागितली. त्यानंतर या व्यापाऱ्याने तक्रार केल्यावर पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी प्राथमिक चौकशी केली. चौकशीत हे दोन्ही पोलीस कर्तव्य करताना दोषी आढळले.
























































