
मुलुंड ते कळवा लोकल ट्रेनने प्रवास करत असताना तोल गेल्याने तरुण विटावा खाडीत पडल्याची घटना समोर आली आहे. खाडीत पडलेल्या तरुणाला शोधण्यासाठी युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. आकाश शर्मा असे खाडीत पडलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
विटावा खाडीत तरुणी पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्नीशमन दलाचे कर्मचारी आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आकाशचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.
आकाश शर्मा हा कळव्यातील घोलाई नगर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळते. मुलुंड ते कळवा प्रवास करत असताना आकाशचा तोल गेला अन् तो थेट विटावा खाडीत पडला. यानंतर गौतम ठाकरे यांनी तरुण खाडीत पडल्याची माहिती पोलीस आणि आपत्कालीन व्यवस्थापन दलाला दिली. यानंतर दोन बोटींच्या सहाय्याने आकाशचा शोध घेण्यात येत आहे.