ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शारदा देशमुख असं त्यांचे नाव असून फिनेल पिऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा केला. देशमुख यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस उप निरीक्षक शारदा अंकुश देशमुख यांची नेमणूक कापूरबावडी पोलीस ठाण्यात होती. येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्याशी गुन्हे तपासाबाबत झालेल्या वादातून वाईट वाटून घेत शारदा देशमुख यांनी राहत्या घरी फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना उपचारासाठी ठाण्यातील वेदांत या खासगी रुग्णालयात दाखल केले. असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत उपायुक्त परिमंडळ ५ चौकशी करणार असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांना तोपर्यंत ठाणे नियंत्रण कक्ष येथे संलग्न करण्यात आले आहे.