ठाण्यात शिवसेनेची मशाल धगधगणारच! स्नेह मेळाव्यात शिवसैनिकांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा शिवसेनेचा वसा यापुढेही सुरू राहणार असून ठाण्यात शिवसेनेची मशाल धगधगणारच, असा एकमुखी निर्धार शिवसैनिकांच्या स्नेह मेळाव्यात करण्यात आला. सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रभाग क्रमांक ३ मधील मानपाडा, आझादनगर, मनोरमानगर विभागात असलेल्या शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर, उपशहरप्रमुख संतोष शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यास मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. नागरी समस्या सोडवण्याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.

नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा निश्चयही मेळाव्यात करण्यात आला. यावेळी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर, चंद्रकांत केसरे, मानपाडा शाखाप्रमुख विठ्ठल डोंगरे, मनोरमानगर शाखाप्रमुख सागर ढवळे व अनंत जाधव, गणेशनगर शाखाप्रमुख संजय जाधव, महिला आघाडी संघटक ज्योती कदम आदी उपस्थित होते.