
मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधारा चक्क ग्रामस्थांच्या जमिनीवर बांधला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.पतन विभागात आज आयोजित केलेल्या बैठकीत आमच्या जमिनीवर,ज्याचा सातबारा आमच्या जमिनीवर आहे त्या ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारा कसा बांधला गेला असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
गेली अनेक वर्ष मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम रखडले असून ते वादग्रस्त ठरत आहे.आज यासंदर्भात पतन विभागाच्या कार्यालयात एक बैठक पार पडली.त्याबैठकीला सरपंच आकांक्षा कीर,ग्रामसेवक- माने,पंचायत समिती सदस्य – परेश सावंत ,ग्रामस्थ नागेश कांबळे, छोट्या भाटकर बावा नार्वेकर, भैय्या भाटकर, दत्तगुरु कीर, पप्या कीर,पपू शिवलकर,रवि आलीम,बाबु कांबळे, सुनील कांबळे, भिकाजी कांबळे, विजय तळेकर,अजीत भाटकर, बंटी भाटकर, मयुरेश्वर पाटील,मनोहर किल्लेकर, उल्हास कीर, मया पाटील, अबू भाटकर,दिप भाटकर, आदित्य भाटकर, पाटील, जाधव,दिपा मुरकर, प्रीया जाधव, सुजाता भाटकर,संजया कीर,रीया पाटील,मयुरी कीर, सिमरन कीर उपस्थित होते.
मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या अर्धवट कामामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा पाढा ग्रामस्थांनी मांडला.मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा मूळ जागेवर न बांधता आमचा सातबारा असलेल्या जमिनीवर बांधला गेला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.जसा नगरपरिषदच्या हद्दीत ४० फूट आतमध्ये समुद्रात बंधारा बांधला गेला आहे तसाच आमच्या भागातील बंधारा ४० फूट आत बांधा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.































































