
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आणि विभागप्रमुख महेश सावंत यांच्या प्रयत्नांतून मुंबईच्या राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेत्या मुंबई महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या विशाखा राऊत, उपनेते मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव ॲड. साईनाथ दुर्गे, विभागसंघटक नगरसेविका श्रद्धा जाधव, मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.





























































