कर्जासाठी मृतदेह बँकेत नेला

 

ब्राझीलमध्ये एका मृत व्यक्तीला व्हिलचेअरवर बसवून एका महिला थेट बँकेत पोहोचली. 68 वर्षीय या व्यक्तीच्या सहीने या महिलेला बँकेतून कर्ज घ्यायचे होते. मात्र वेळीच महिलेचा डाव उघडकीस आला. एरिका डिसूजा न्यून्स असे या महिलेचे नाव असून ती एका व्यक्तीला व्हिलचेअरवर बसवून बँकेत घेऊन गेली. या व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि ती त्यांना अंकल म्हणून हाक मारत होती. मात्र बँक कर्मचाऱयांना संशय आला. त्यांनी लागलीच पोलिसांना प्राचारण केले. तपासणीत ती व्यक्ती मृत असल्याचे निदर्शनास आले.