
वाजतगाजत घोडय़ावर स्वार होऊन नवरा मंडपात पोहोचतो हे चित्र आपण वर्षानुवर्षे पाहत आलोय. परंतु मध्य प्रदेशातील एका लग्नात अनोखे चित्र पाहायला मिळाले आहे. चक्क घोडय़ावर स्वार होऊन मंडपात पोहोचली.
लग्नात घोडय़ावरून मांडवात पोहोचण्याची दीपा वालेचा या तरुणीची इच्छा होती. दीपाने घरातल्यांना ही इच्छा सांगितली. तेव्हा वालेचा कुटुंबीयांनीही कसलाही विचार न करता मुलीची इच्छा पूर्ण केली.
मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव करू नये, जितके अधिकार मुलाला आहेत तितकेच मुलीलादेखील आहेत हा संदेश समाजाला द्यायचा होता, असे वालिचा कुटुंबीयांनी सांगितले.




























































