मध्य रेल्वेकडून एप्रिल महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने 2022-23 या आर्थिक वर्षाची सुरुवात एप्रिल 2022 मध्ये अनेक वस्तूंचे सर्वोत्तम लोडिंग करून सकारात्मक पद्धतीने केली. मध्य रेल्वेने एप्रिल 2022 मध्ये 7.14 दशलक्ष टन मालवाहतूक करण्याचे आतापर्यंतचे सर्वोत्तम यश संपादन केले आहे. जे एप्रिल 2021 मधील 6.25 दशलक्ष टनांपेक्षा 14.2% जास्त आहे.

मध्य रेल्वेच्या इतिहासात प्रथमच नागपूर विभागातील बल्हारशाह येथून लोहखनिजाचे लोडिंग सुरू झाले. एप्रिल 2022 मध्ये, मध्य रेल्वेने लोहखनिजाचे 35 रेक लोड केले. नागपूर विभागाने एप्रिल 2021 मध्ये 799 रेकच्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये 954 रेक कोळसा लोड केला. मध्य रेल्वेने एप्रिल 2021 मध्ये 31 रेकच्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये ऑटोमोबाइलचे 66 रेक लोड केले. एप्रिल 2021 मध्ये 14 रेकच्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये 61 रेक अन्नधान्य लोड केले गेले. एप्रिल 2022 मध्ये साखरेचे 109 रेक लोड करण्यात आले, तर एप्रिल 2021 मध्ये 86 रेक लोड करण्यात आले. त्याचप्रमाणे, एप्रिल 2022 मध्ये स्टीलचे 96 रेक लोड केले गेले, तर एप्रिल 2021 मध्ये 80 स्टीलचे रेक लोड केले गेले.

मध्य रेल्वेने एप्रिल 2021 मध्ये शून्य रेकच्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये जिप्समचे 4 रेक आणि फ्लाय ऍशचे 8 रेक लोड केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, मध्य रेल्वे ही प्रगतीच्या वाटेवरील एक प्रमुख खेळाडू आहे आणि आगामी काळात रेल्वेच्या प्रयत्नांना हातभार लावत आहे.