
पावसाळा तोंडावर आल्यामुळे पालिका नालेसफाई वेगाने करीत आहे. यामध्ये रेल्वे हद्दीमधील नालेसफाई योग्यरीत्या करावी आणि केलेले काम प्रमाणित करावे, असे सक्त निर्देश पालिका प्रशासनाने संबंधित अभियंत्यांना दिले आहेत. मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मिळून सुमारे 116 कल्व्हर्टर आहेत. या तिन्ही मार्गांवरील कल्व्हर्टची नालेसफाई पालिका रेल्वेच्या समन्वयाने करीत असते. रेल्वे हद्दीमधील नालेसफाईदेखील परिणामकार व्हावी यासाठी पर्जन्य जलवाहिनी विभागाने योग्यरीत्या काम करावे असे निर्देश देण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

























































