पालिकेचा मत्स्यालय प्रकल्प रखडणार; पाच कंपन्या येऊनही आचारसंहितेचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात होणारे आंतरराष्ट्रीय धर्तीवरील मत्स्यालय उभारणीला पाच पंपन्यांनी प्रतिसाद देऊनही या प्रकल्पाचे काम आता रखडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे काम रखडण्याची शक्यता आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात सिंगापूरच्या धर्तीवर हे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून पाच कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. या प्रकल्पात काचेच्या टनेलमधून देशीविदेशी रंगीबेरंगी माशांसह पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवता येणार आहे. साडेपाच हजार चौरस फूट जागेवर सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. तर पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या पेंग्विनची संख्या वाढल्याने आणखी मोकळी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे,मात्र आचारसंहितेमुळे हे काम आता निवडणुकीनंतर होणार आहे.

असे आहे नियोजन

या मत्स्यालयात दोन टनेल असून एक-14 मीटर, दुसरे – 36 मीटरचे राहणार आहे. यामध्ये पारदर्शक काचा असतील. यामध्ये पेंग्विन कक्षाच्या समोर देशीविदेशी रंगीबेरंगी मासे पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहेत.