भायखळ्यातील भूखंड 9 वर्षांनंतर अखेर पालिकेच्या मालकीचा; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या मालकीचा भायखळा येथील पुनर्विकासात मिळालेला आरक्षित भूखंड शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांनी तब्बल 9 वर्षे केलेल्या पाठपुराव्यानंतर महापालिकेच्या मालकीचा झाला. या भूखंडावर आता महापालिका सर्वसामान्यांसाठी तीन मजली विरंगुळा पेंद्र, अभ्यासिका, वेल्फेअर सेंटरसह बहुउद्देशीय इमारत बांधणार आहे.
भायखळा पूर्व येथील शिवदास चापशी मार्गावर वॉलेस फ्लोर मिलची जागा होती. मिलच्या पडीक जागेचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जागेचा बदल निवासी जागेत करण्यात आला. नियमानुसार अशा प्रकारचा पुनर्विकास करताना महापालिकेला सुविधा सेंटर म्हणून 5 टक्के जागा देण्याची अट आहे. विकासकाने या जागेचा विकास निवासी इमारतींकरिता करताना महापालिकेला 5 टक्के जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र, त्याची माहिती पालिका अधिकारी आणि कर्मचाऱयांना नसल्यामुळे ही जागा अनेक वर्षांपासून पडीक होती. माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी 2012 पासून यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला.

ऑमिनिटी प्लॉटची नोंद
मनोज जामसुतकर यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला असता ती जागा महापालिकेला विकासकाकडून ऑमिनिटी प्लॉट म्हणून प्राप्त झाल्याची नोंद मिळाली. पण विकासकाने ती जागा महापालिकेच्या नावे करून दिली नव्हती. त्यामुळे ती जागा तशीच पडून राहिली. महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱयांचे त्याकडे कधीच लक्ष गेले नाही.

विरंगुळा पेंद्राचे भूमिपूजन
महापालिकेच्या नगर अभियंता विभागाच्या अखत्यारित या विरंगुळा पेंद्राच्या वास्तूंचे बांधकाम केले जाणार असून याचे कार्यादेशही जारी करण्यात आले आहे. कार्यादेशानंतर या वास्तूच्या कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका सोनम जामसुतकर आणि मनोज जामसुतकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

वॉलेस फ्लोर मिलच्या जागेवरील पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत महापालिकेला ही मोकळी जागा मिळाली. मात्र, हा भूखंड आपल्या मालकीचा असल्याची कल्पनाच महापालिकेला नव्हती. माझ्या नगरसेवकपदाच्या कारकिर्दीतील तीन ते साडेतीन वर्षे आणि सोनम जामसुतकर यांच्या कारकिर्दीतील पाच वर्षे आणि आता पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती असताना एक ते दीड वर्षाच्या कालावधीत मी सतत याचा पाठपुरावा केल्याने अखेर हा कोटय़वधीचा भूखंड पालिकेच्या मालकीचा झाला.
मनोज जामसुतकर, उपनेते