बंडखोरी भाजपच्या अंगलट; हायकोर्टाने धाडली नोटीस

शीव-कोळीवाडा मतदारसंघातील बंडखोरी भाजपच्या अंगलट आली आहे. शिंदे गटाच्या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने भाजपला नोटीस जारी केली आहे. पूजा कांबळे या शिंदे गटाकडून महायुतीच्या अधिकृत उमेदवार असताना भाजपच्या शिल्पा केळुसकर यांनी बंडखोरी केली. कांबळे यांनी याला याचिकेद्वारे आव्हान दिले. केळुसकर यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी कांबळे यांनी केली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. आम्ही ही बंडखोरी रोखू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.