‘खाशाबा’च्या शूटिंगला सुरुवात

दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे. मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘खाशाबा’ चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर आता चित्रपटाच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे.
1952 साली ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे ऐतिहासिक पदक जिंकणारे कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठी मातीतील विस्मृतीत गेलेल्या एका झुंजार नायकाचा असाधारण जीवनप्रवास खाशाबा चित्रपटाच्या निमित्ताने मांडला जाणार आहे. जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित आगामी मराठी चित्रपट खाशाबाचे चित्रीकरण सुरू झाल्याची घोषणा केली आहे. चित्रपट 2025 मध्ये येईल.