
जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिह्यातील मुन्ताझीर रशीद या 21 वर्षीय कलावंताने सर्वात लहान आकाराचे ओरिगामी पेपर फूल बनवले आहे. त्याच्या कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. मुन्ताझीरने 3 सेंटीमीटर बाय 1.08 सेंटीमीटर ओरिगामी कलाकृती तीन मिनिटं 55 सेपंदात साकारली.
रशीदला लहानपणापासूनच कलेची आवड आहे. त्याने टाकाऊ वस्तू, पुठ्ठा यांच्यापासून विविध वस्तू साकारल्या आहेत. आतापर्यंत अनेक हस्त कौशल्याच्या वस्तू बनवून त्यांची विक्री केली आहेत. ‘‘मेहनत आणि सातत्याच्या जोरावर स्वप्न सत्यात उतरवता येते, माझा कौशल्याची दखल घेतल्याने आनंद वाटतोय. यामुळे नवनवीन कलाकृती साकारायला प्रोत्साहन मिळते,’’ अशी प्रतिक्रिया रशीदने दिली आहे. रशीदचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहेत. त्याची आणखी तीन पुस्तके लवकरच येणार आहेत.

























































