तीन दिवसांनंतर शेअर बाजार सावरला

हिंदुस्थानी शेअर बाजारात सलग तीन दिवस घसरण झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजार वधारला. सेन्सेक्स 319 अंकांनी वधारला, तर निफ्टी 82 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये 0.8 टक्क्यांची वाढ होऊन 83,535 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 0.32 टक्क्यांनी वाढून 25,574 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील इन्पहसिस, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, टीसीएस, भारती एअरटेल, टायटन, बजाज फिनसर्व, रिलायन्स आणि एलअँडटीचे शेअर वाढले, तर अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, ऑक्सिस बँक, एसबीआय, अदानी पोर्टस्, हिंदुस्थान युनिलिवरचे शेअर्स घसरले.