
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा गवळी मागील 18 वर्षांपासून जामिनासाठी प्रयत्न करत होता. त्याचा जामीन मंजूर झाला असला तरी आज त्याची सुटका झाली नाही.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्यासंदर्भातील अटी-शर्ती सत्र न्यायालय निश्चित करेल असे स्पष्ट केले होते. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयातून अटी-शर्ती निश्चित झाल्यावर जामिनासंदर्भात ऑर्डर जारी होईल.