
संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून (आज) सुरू झाले आहे. यावेळी महाराष्ट्रात राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा होत असलेला अपमान आणि कर्नाटककडून सीमाभागात सुरू असलेली दडपशाही याचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.
View this post on Instagram
‘महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संसद भवनाच्या परिसरातील पुतळ्यासमोर उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या खासदारांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. बीदर, भालकी, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणाही दिल्या’.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संसद भवनाच्या परिसरातील पुतळ्यासमोर उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या खासदारांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला.बीदर,भालकी,बेळगाव,कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणाही दिल्या. pic.twitter.com/qBSD680rpv
— Supriya Sule (@supriya_sule) December 7, 2022


























































