
कात्रज डेअरीजवळ दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडील रोकड लुटणाऱ्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. शंकर कैलास पन्नेकर (वय 22, रा. बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. परशुराम मुचडे (वय 42,रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सोमवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास परशुराम दुचाकीवरून कात्रज डेअरी चौकातून जात होते. त्यावेळी परशुराम यांना कोणीतरी हाक मारली असता ते थांबले. त्यानंतर शंकरने दगड मारून त्यांना जखमी केले. त्यांच्या खिशातील पैसे काढून घेतले. परशुराम यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी शंकरला अटक केली असून त्याचा साथीदाराचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गोडसे तपास करत आहेत.





























































