नगरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरंबद

361

नगर – मनमाड महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागच्या पथकाने पर्दाफाश केला असून या प्रकरणात पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांवर नगर शहरासह जिल्हयात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पकडलेल्या आरोपींकडून अन्य गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. आरोपींमध्ये सागर आण्णासाहेब भांड (वय 24), किरण रावसाहेब जरे ( वय 33), अमोल जगन कदम (वय 28), श्रीकांत सुरेश लाहुंडे (वय19), अल्लाउद्दीन इत्राहीम शेख (वय 23), दिपक रविकांत उपाध्याय (वय 25) यांचा समावेश आहे.

सागर भांड त्याच्या सहा ते सात साथीदारासह तीन मोटार सायकलवरुन शनिशिंगणापूर रोडने राहूरीचे दिशेने नगर-मनमाड़ रोडवर कोठेतरी दरोडा टाकण्यासाठी जात असल्याची माहिती 12 डिसेंबरला सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार समजली. या माहितीवरुन सहपोलीस निरीक्षक शिरीशकुमार देशमूख, सह फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलीस हेड काॉनस्टेबल बाळासाहेब मुळोक, पोलीस नायक रविंद्र कर्डिले, सचिन आडबल, अशोक गुंजाळ, शिवाजी ढाकणे, रणजिन जाधव, राव सोनटक्के, विजयकुमार वेठेकर, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावो, दिपक शिदे, मेघराज कोल्हे , संभाजी कोतकर, सचिन कोळेकर यांनी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी नितीन उर्फ सोन्या मच्छिन्द्र माळी याची झडती घेतली असता त्यांचेजवळ पल्सर, लोखंडी कोयता, सत्तूर, लाकडी दांडके, सुरा, नायलॉन दोरी, मिरची पूड व सहा मोबाईल असा एकूण 1,29,550 रुपयांचा मुद्देमाल सापडला. आरोपी दरोड्याची तयारी करुन कोठेतरी दरोडा घालण्यासाठी जात असताना सापडल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या