देवगडमध्ये घरफोडी; 29 हजारांचा मुद्देमाल लांबवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगडमधील कुवळे लाडवाडीमध्ये घरफोडी झाली असून चोरट्यांनी 29 हजाराचा मुद्देमाल लांबवला आहे. कुवळे लाडवाडी येथील बंद घराच्या जिन्याजवळ असलेल्या भिंतीच्या खिडकीतून चोरटे घरात शिरले आणि 29 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार अमोल विजय पाताडे (रा. भांडुप,सध्या रा.कुवळे लाडवाडी) यांनी देवगड पोलिसात दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 ऑगस्ट ते 12 डिसेंबरदरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता पाताडे कुटुंबीयांनी गावी येऊन कुलूप उघडून घरात प्रवेश केला. त्यांना घराच्या जिन्याकडील भिंतीला असलेली खिडकी उघडी दिसली. तसेच घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी 12 हजार रुपयांचे होंडा कंपनीचे ग्रासकटर ,8 हजार रुपयांचे स्पा.कंपनीचे कटर,1 हजार रुपयांचे स्पीकर,6,600 रुपयांची गिअर रायफल,1 हजार रुपयांचे गिअर पंप ,400रुपयांचे स्पाय कार्ड एवढा मुद्देमाल लांबवला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार तुकाराम पडवळ करीत आहेत.