
लांब पल्ल्याच्या एक्प्रेसमध्ये प्रवाशाचे साहित्य चोरणाऱया चोरटय़ाला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गजाआड केले. जगदीश चंदर असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 9 लाख 71 हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोन गुह्यांची उकल केली आहे.
जून महिन्यात एस. सुंदरी कोनार या तिरुवेली-दादर एक्प्रेसने प्रवास करत होत्या. बदलापूर-विठ्ठलवाडीदरम्यान दोन जण त्याच्याकडे आले. बॅग उतरवण्यास मदत करतो असा बहाणा करून चोरटय़ांनी बॅगेतून सोन्याचे दागिने काढून पळ काढला. बॅगेतून दागिने चोरी झाल्याप्रकरणी कोनार यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. कल्याण रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. याचा समांतर तपास रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक करत होते. पोलीस उपायुक्त एम मकानदार, प्रदीप चव्हण यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या.
प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सहायक निरीक्षक सचिन लोखंडे, हेमराज साठे, श्रीकृष्ण चव्हाण यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. चोऱया करणारा आरोपी हा हरयाणाचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक हरयाणा येथे गेले. पोलिसांनी जगदीशला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर जगदीशने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या घरातून पोलिसांनी एकूण 9 लाख 71 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जगदीश हा मौजमजेसाठी एक्प्रेसमध्ये चोऱया करतो. त्याचे दोन इतर साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

























































