यशवंतनगर येथे घरफोडी, सोन्या-चांदीचे दागीने, रोकड पळवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील यशवंतनगर भागातील घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे ७२९५० रुपयांचा मुद्देमाल पळवण्यात आला.

शहरापासून सुमारे चार कि.मी. अंतरावरील यशवंतनगर भागातील युवराज दिगंबर जाधव यांच्या घराचे कुलूप  तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे, चांदीचे दागीने आणि रोख रक्कम असा सुमारे ७२९५० रुपयांचा मुद्देमाल पळवण्यात आला. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. चोरट्यांनी घरातील चांदीची लक्ष्मीची मुर्ती, गणपतीची मुर्ती, चांदीचे जोडवे, चांदीचे धोंडे, सोन्याचे धोंडे, मोबाईल  आणि रोख रक्कम पळवली. या संबंधी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.