निलंगा बस स्थानकातून 5 लाख 67 हजार रुपये पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । निलंगा

निलंगा येथील बसस्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना 5 लाख 67 हजार रुपये चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली. या संदर्भात निलंगा पोलीस ठाण्यात सदानंद शरणाप्पा ढबाले राहणार औराद शहाजनी यांनी तक्रार दाखल केली.

निलंगा येथील बसस्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगला ब्लेडने कापून बॅगमधील 5 लाख 67 हजार रुपये लांबवले. निलंगा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाटकरे करीत आहेत.