पाषाणमध्ये बंद घरातून सव्वा लाखांची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, 12 हजाराची रोकड असा 1 लाख 16 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला आहे. ही घटना पाषाणमधील तुकाई मुकादम चाळीत घडली. याप्रकरणी सुनिल मोहनकुमार शर्मा (वय 33) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सुनील कामानिमित्त 13 ते 20 फेब्रुवारीदरम्यान बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरचा कडीकोयंडा उचकटून कपाटात ठेवलेले दागिने व रोक असा एकूण 1 लाख 16 हजाराचा ऐवज चोरून नेला. सुनील घरी परत आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात पाहणी केली असता, चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.