बँकेतून पैसे काढले; घरी जात असताना चोरट्यांनी लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँकेतून 38 हजारांची रक्कम काढून पिशवीतून नेणाऱ्या एकाला दोन महिलांनी बँकेच्या गेटजवळ मागे-पुढे उभे राहून गर्दी झाल्याचे भासवत रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये घडली. याप्रकरणी इसाक शेख (वय 43, रा. हडपसर) यांनी तक्रार दाखल केली आहे.

इसाक यांनी बुधवारी दुपारी बँकेतून 38 हजारांची रक्कम काढली. त्यानंतर ते रक्कम सॅकमध्ये टाकून घरी निघाले होते. त्यावेळी दोन महिलांनी बँकेच्या गेटजवळ गर्दी झाल्याचे भासवत इसाक यांच्या सॅकमधील 38 हजारांची रक्कम चोरून नेली. याप्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.