रत्नागिरीत घरफोडी; 10 लाखांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहरातील थिबापॅलेस रोडजवळील बंद घर फोडून चोरट्याने 10 लाख 79 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये 9 लाख 87 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 15 हजार रुपये किंमतीची रक्कम, 17 हजार रुपये किंमतीची घड्याळे, 32 हजार रुपये किंमतीची स्वीस आणि डिझेल कंपनीची घड्याळे, 20 हजार रुपये किंमतीचे गॉगल, 25 हजार रुपये किंमतीचे दोन अ‍ॅपल कंपनीचे टॅब चोरट्यांनी लंपास केले. समीर एजाज गुहागरकर (वय 46) यांनी या चोरीची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. गुहागरकर कुटूंबीय हज यात्रेसाठी गेले असताना बंद घरातील तळमजल्यावरील लोखंडी गज वाकवून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि 10 लाखांचा मुद्देमाल लंपास केला.