
आंतराराष्ट्रीय टेनिस कॅलेंडरच्या पहिल्याच आठवड्यात भारतातील सर्वात मोठी टेनिस स्पर्धा टाटा ओपन महाराष्ट्र पुनरामगन करीत असताना जगातील अव्वल खेळाडूंच्या सहभागामुळे हि स्पर्धा अधिकच रोमांचकारी ठरणार आहे. यामध्ये अव्वल 100 मधील 17 खेळाडूंचा समावेश आहे.
ह प्रतिष्ठेची स्पर्धा आपले पाचवे वर्ष साजरे करीत असताना आयएमजीच्य मालकीच्या आणि राईजचे व्यवस्थापन लाभलेल्या दक्षिण आशियायातील एकमेव 250 स्पर्धेला टाटा मोटर्सने आपले प्रायोजकत्व कायम राखले आहे. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार्याने आयोजित केलेली हि स्पर्धा 31 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी येथे होणार आहे. या स्पर्धेची रंगत वाढवणरे पाच मानांकित खेळाडू असे आहेत.
South Asia’s only ATP 250 tournament returns to the start of the Tennis season again 🥳
Big names are heading to #Pune next month as they look to begin 2023 with a bang! 🎾💥#Tennis #ATPTour #TataOpenMaharashtra #IndianTennis #TOM2023 @atptour @TennisTV @IndTennisDaily pic.twitter.com/CB3M5NPh9i
— Tata Open Maharashtra (@MaharashtraOpen) December 21, 2022
1. मरीन चिलीच (जागतिक क्र. 17):
क्रोऐशियाचा मारिन चिलीच टाटा ओपन स्पर्धेत चार वर्षानंतर पुनरागमन करीत आहे. 2018 मध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या व माजी जागतिक क्र. 3 च्या चिलीच याने यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठून आपला फॉर्म सिद्ध केला आहे. टाटा ओपन विजेतेपदासाठी तो निश्चितच दावेदार आहे. त्याने ऍडलेड 2022 स्पर्धेत 550 व्या विजयाची नोंद करताना अशी कामगिरी करणारा जगातील केवळ सातवा खेळाडू होण्याचा मान मिळवला. त्याने 2009 व 2010 मध्ये चेन्नई येथे झालेल्या टाटा ओपन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. 2014 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या चिलीचचा हि स्पर्धा जिंकण्यासाठीच प्रयत्न राहिल.
2. एमिल रुसुव्होरी(जागतिक क्र.40):
फिनलंडचा युवा खेळाडू एमिल रुसुव्होरी याने गतवर्षीच्या टाटा ओपन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारताना उल्लेखनीय कामगिरी केली होती. अंतिम लढतीत त्याला जोओ सोसा याच्याकडून पराभव पत्करावा लागला. परंतु 23 वर्षीय एमिल याने त्यानंतर प्रगती करताना जागतिक क्रमवारीत 87 व्या क्रमांकावरून ४०व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. फिनलंडचा सर्वोत्तम खेळाडू असलेल्या एमिलने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांबरोबरच डेव्हिस चषक स्पर्धेतही आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्यावर्षी न मिळवता आलेले विजेतेपद यंदाच्या वर्षी पटकवण्यासाठी एमिल सज्ज झाला आहे
3. युकी भांब्री(जागतिक क्र.553):
जगातील अव्वल माजी ज्युनियर खेळाडू असलेल्या युकी भांब्रीने टाटा ओपन स्पर्धेच्या एकेरी पात्रता फेरीतील एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. मानांकन यादीतील 127 व्या क्रमांकावर झेप घेतल्यामुळे त्याला या स्पर्धेत खेळता येणार आहे. सुमारे 2 वर्षे दुखापतीमुळे दूर राहिल्यानंतर पुनरागमन करताना त्याने जबरदस्त कमबॅक केल्याचे दाखवून दिले आहे. युथ ऑलिम्पिकमधील माजी रौप्य पदक विजेत्या युकीने सहा एटीपी चॅलेंजर स्पर्धांमध्ये दुहेरीत सहा विजेतेपद पटकावली असून याच यशाची एकेरीतहि पुनरावृत्ती करण्यास तो उत्सुक आहे. मायदेशातील प्रेक्षकांसमोर त्याच्या मोहिमेला 31 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे.
4. एलियास यमेर(जागतिक क्र.127):
टाटा ओपन स्पर्धेच्या गतमालिकेत पात्रता फेरीपासून उपांत्य फेरीपर्यंत यमेरचा प्रवास स्वप्नवत होता. एकेरीत अग्रमानांकित असलन कारस्तेवाह याच्यावर सरळ सेटमध्ये विजय मिळवून त्याने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. 2015 मध्ये सर्व चारही ग्रँडस्लॅमसाठी पात्र ठरणारा तो केवळ दुसरा खेळाडू ठरला. पुण्यामधील टाटा ओपन स्पर्धेतून एटीपी एकेरीत विजतेपदाचा दुष्काळ संपवता येईल असा त्याला विश्वास वाटतो.
5. सेबस्तियन बेझ(जागतिक क्र.43):
उदयोन्मुख खेळाडू बेझ टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. केवळ 21 वर्षाच्या बेझने पहिल्या वर्षी एटीपीमध्ये पदार्पण आणि चारही ग्रँडस्लॅममध्ये सहभाग अशी सनसनाटी सुरुवात केली. एका मौसमात चार चॅलेंजर स्पर्धेत विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. यंदाची इस्टोरियल ओपन स्पर्धा जिंकून त्याने चमकदार कामगिरी केली आहे. तसेच, बास्टार्ड येथील स्पर्धेत आठव्या मानांकित आंद्रे रुबलेव्ह याच्यावर सनसनाटी विजय मिळवताना त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम विजयाची नोंद केली. पुण्यातील स्पर्धेतुन टाटा ओपन स्पर्धेचे पदार्पण विजयाने साजरे करण्यास तो उत्सुक आहे.

























































