
खाण्याच्या चुकीच्या सवयी, बाहेरचे खाणे, तळलेले पदार्थ खाणे आणि व्यायामाच अभावामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्याने हृदयविकाराचा झटका आणि हार्ट स्ट्रोक धोका वाढण्याची संभावना असते. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले कोलेस्टेरॉल आवश्यक असते, तर खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने अनेक गंभीर जीवघेणे आजार होऊ शकतात. जाणून घेऊया चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यासाठी कोणते पदार्थ खावेत जाणून घेऊयात.
ओट्स
आहारात ओट्स असणं फायदेशीर आहे. ओट्स खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. यामध्ये ग्लूकोन नावाचा घटक असतो जो आतडे साफ करण्यास मदत करतो.
लसूण
लसूणमध्ये अॅलिसिन आणि वनस्पती घटक असतात. यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होतो. याद्वारे रक्तदाब देखील नियंत्रित केला जातो. लसूण खाल्ल्याने हृदयरोग आणि स्ट्रोक टाळता येऊ शकतो. लसूणमध्ये असे घटक असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. लसणामध्ये अॅलिसिन आणि मॅंगनीज असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.
कडधान्ये
कडधान्ये खाल्ल्याने शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्यास मदत होते. कडधान्यांमध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात आढळतात, जे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि आवश्यक पोषक घटक मिळतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
सुका मेवा
ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे आढळतात जे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात.काजूमध्ये स्टेरॉल्स, मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
फळे आणि भाज्या
फळं आणि भाज्या खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या खाणे उपयुक्त आहे. त्यामुळे कायम पोषक तत्वांनी युक्त फळे आणि भाज्या खाणे उत्तम मानले जाते.
























































