
केस मऊ मुलायम असण्यासोबत केसांची उत्तम वाढ होणेही तितकेच गरजेचे असते. सध्याच्या घडीला बाजारात नानाविध प्रकारची तेलं उपलब्ध आहेत. आपल्या केसांच्या वाढीसाठी नेमकं कोणतं तेल हे सर्वात गरजेचे आहे हे माहीत असणे क्रमप्राप्त आहे. मॉइश्चरायझर त्वचेला मऊ आणि निरोगी बनवते, तसेच तेल केसांना मॉइश्चरायझ करतात. काळ्याभोर केसांसाठी कोणते तेल सर्वात बेस्ट आहे हे आपण बघुया.
कांद्याची साल केराच्या टोपलीत टाकण्याची चूक तुम्हीपण करताय का?
नारळ तेल – नारळ तेलात मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम सारखे घटक असतात. नारळ तेलामुळे केस मजबूत होतात आणि ते मऊ मुलायम होतात. नारळ तेल दररोज लावल्याने केसांची वाढ जलद होते.
ऑलिव्ह तेल – ऑलिव्ह तेल केसांसाठी देखील उत्कृष्ट आहे. हे तेल केवळ केसांना मॉइश्चरायझ करत नाही तर त्याचे कंडिशनर गुणधर्म कोरडे केस हायड्रेट करतात आणि कोंडा दूर करण्यास मदत करतात. ऑलिव्ह तेलात मध मिसळून लावल्याने केस चमकदार बनतात.
बदाम तेल- व्हिटॅमिन ई समृद्ध, बदाम तेल त्वचा आणि केस दोघांसाठीही फायदेशीर आहे. दररोज केसांना बदाम तेल लावल्याने केस निरोगी, मऊ आणि चमकदार राहतात. नारळाच्या तेलात बदाम तेल मिसळून लावल्याने केस मजबूत होतात.
एवोकाडो तेल– एवोकाडो तेल केसांना नैसर्गिक चमक देते. सर्वोत्तम परिणामांसाठी, अर्धा चमचा नारळ तेल आणि १०-१२ थेंब रोझमेरी तेल एक चमचा तेलात मिसळा आणि ते तुमच्या केसांना लावा. अर्ध्या तासाने ते धुवावेत.
एरंडेल तेल- दाट केस हवे असल्यास, केसांना एरंडेल तेल लावणे सर्वात उत्तम.
रोझमेरी तेल
अकाली पांढरे होणे टाळायचे असेल तर रोझमेरी तेल लावा. लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी ने समृद्ध असलेले रोझमेरी तेल केसांना लांब आणि मजबूत बनवते. केस अकाली पांढरे होणे देखील थांबवते.
केसांची मालिश कशी करावी?
फक्त तुमच्या केसांना तेल लावणे पुरेसे नाही; लांब आणि जाड केसांसाठी केसांना मसाज देखील आवश्यक आहे. प्रथम तुमच्या केसांना तेल लावा, नंतर तुमच्या बोटांनी तुमच्या टाळूला हलक्या हाताने मसाज करा. यामुळे तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचेल आणि तुमचे केस मुळापासून मजबूत होतील.


























































