
घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. निजाम शेख (वय 23, रा. अशोक नगर कोंढवा बुद्रुक) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत चोरटा निजाम शेख कोंढव्यातील मिठानगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत त्याने दोन घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 1 लाख 40 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.































































