चोरटय़ाने ज्वेलर्सचे घर केले साफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इमिटेशन ज्वेलर्सच्या घरी चोरटय़ाने घरफोडी केल्याची घटना मालाड येथे घडली. 9 लाख रुपये घेऊन चोरटय़ाने पळ काढला आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मालाड येथे ज्वेलर्स राहतात. सोमवारी दुपारी ते मुलासोबत कारखान्यात निघून गेले. त्याने दरवाजाला कुलूप लावले होते. घरात कोणी नसल्याचे पाहून चोरटा हा आत शिरला. त्याने घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे 9 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. सायंकाळी ज्वेलर्सची पत्नी घरी आली. तेव्हा घरपह्डीचा प्रकार तिच्या लक्षात आला.