मंदिराबाहेर ब्रॅण्डेड बूट चोरणाऱ्या भामट्याला अटक

727

दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराबाहेर ब्रँण्डेड बूट लंपास करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. मंदिराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये हा चोरटा कैद झाला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पंकज शरण (44) असे त्याचे नाव आहे.

रविंद्र सिंग हा सुरक्षा रक्षक असून तो नेहमी बाबुलनाथ मंदिरात जातात. यामुळे सवयीप्रमाणे तो 23 सप्टेंबरलाही  मंदिरात गेले. त्यांनी मंदिराबाहेर बूट बाहेर काढले व ते दर्शनाला गेले. त्यानंतर पूजा झाल्यावर ते आले असता बूट गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेरा हजार रुपयांचे बूट गायब झाल्याने रविंद्र सिंग हादरले. त्याने तडक गावदेवी पोलीस स्टेशन गाठले व बूट हरवल्याची तक्रार केली.

या घटनेनंतर रविंद्रवर पोलिसांची नजर आहे. चोरलेले बूट चोर बाजारात विकण्याचा रविंद्रचा मानस होता,असेही रविंद्र सिंग यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या