
रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी, रिक्षा चोरून त्या गाडय़ा विकणारी टोळी शिवाजी नगर पोलिसांच्या हाती लागली आहे. नशेसाठी गाडय़ा चोरणाऱया या टोळीकडून पोलिसांनी दोन रिक्षा आणि पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
गोवंडी परिसरात गाडय़ा चोरणारी एक टोळी सक्रीय असल्याची माहिती एपीआय धनंजय देवडीकर यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अर्जुन रजाने यांच्या मार्गदर्शनाखाली देवडीकर व त्यांचे पथक गाडी चोरणाऱयांचा शोध घेत होते. दरम्यान पाच जणांची एक टोळी असून त्यांनी काही गाडय़ा चोरून त्या ऐके ठिकाणी नेऊन ठेवल्या आहेत व त्या विकण्यासाठी ग्राहक शोधत आहेत, ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करत मोसीन शेख, वाजीद खान, वाहीद खान, साकीर शेख, जावेद खान अशा पाज जणांना पकडले.
या आरोपींकडून चोरीच्या पाच दुचाकी आणि दोन रिक्षा हस्तगत करण्यात आल्या. या गाडय़ा ते विकण्याच्या प्रयत्नात होते. पण शिवाजी नगर पोलिसांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले.

























































