किनगाव येथे बंद घर चोरट्यांनी फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. 1 लाख 58 हजार 200 रुपयांचे सोन्याचे दागिने पळवून नेले. या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात नामदेव केशवराव दहीफळे रा. भागीरथी विद्यालयाशेजारी किनगाव यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादी हे आपल्या पत्नीसह घराला कुलूप लावून पिंपळदरी येथे सप्ताहाच्या कार्यक्रमाला गेले होते. घरी कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉकर तोडून 1 लाख 58 हजार 200 रुपयांचे सोन्याचे दागिने पळवले. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.