Ind Vs Aus तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाची 197 धावांची आघाडी

Sydney: Australia's Marnus Labuschagne on 130 not out at the end of play on day 1 of the third cricket test match between Australia and New Zealand at the Sydney Cricket Ground, Sydney, Australia. Friday Jan. 3 2020 . AP/PTI(AP1_3_2020_000038B)

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा 2 बाद 96 वर असलेली टीम इंडिया काही तासातच ऑलआऊट झाली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फंलदाजांनी जबरदस्त फलंदाजी करत 197 धावांची आघाडी घेतली आहे. दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 2 बाद 103 धावांवर होती. सध्या मार्नस लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ मैदानावर आहेत. दोघांचाही चांगला जम बसला असून चौथ्या दिवशीही जर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चांगले खेळले तर टीम इंडियासाठी ही धोक्याची बाब असेल.

तिसऱ्या दिवशी अवघ्या 148 धावात टीम इंडियाचे आठ खेळाडू बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला चांगली 94 धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाच्या 244 धावांमध्ये शुभमन गिल व चेतेश्वर पुजारा यांची अर्धशतकं आहेत. दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी आश्वासक सलामी देऊनही मधल्या फळीतील चेतेश्वर पुजारा सोडला तर इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने जबरदस्त गोलंदाजी करत शुभमन गिल व पुजारा यांच्यासहीत चार खेळाडूंना तंबूत परत पाठवले. त्याखालोखाल हेझलवूडने दोन व स्टार्कने 1 विकेट घेतली आहे. दरम्यान मधल्या फळीतील फंलदाज हनुमा विहारी तिसऱ्या कसोटीत देखील फ्लॉप ठरला आहे. विहारीने या सत्रात देखील अवघ्या 4 धावा करत तो रन आऊट झाला.

यशस्वी ‘सलामी’

हिंदुस्थानने या कसोटीत रोहीत शर्मा व शुभमन गिल या दोघांच्या खांद्यावर सलामीवीराची भूमिका सोपवली. संघ व्यवस्थापनाचा हा डाव यशस्वी ठरला. दोघांनी 70 धावांची आश्वासक सलामी दिली. पहिल्या दोन कसोटींमध्ये हिंदुस्थानच्या सलामीवीरांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नव्हती. आयपीएलनंतर दर्जेदार किंवा स्पर्धात्मक क्रिकेट खेळणाऱया रोहीत शर्माने 26 धावा केल्या. या खेळीत त्याने वेगवान गोलंदाजांना आकर्षक चौकारही मारले. तसेच नॅथन लायनच्या गोलंदाजीवर या मुंबईकराने पुढे सरसावत मारलेला षटकारही लाजवाब होता. ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर रोहीत शर्मा बाद झाला.

स्मिथचे झुंजार शतक

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टिवन स्मिथला या मालिकेत आतापर्यंत सूर गवसला नव्हता. रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर त्याला धावा काढताना अडचण निर्माण होत होती. पण या डावात त्याने अफलातून फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाचे मधल्या व तळाच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरत असतानाच त्याने एकाकी किल्ला लढवला. या पठ्ठय़ाने 226 चेंडूंत 16 चौकारांसह 131 धावांची दमदार खेळी साकारली. रवींद्र जाडेजाने 15 यार्डच्या बाहेरून केलेल्या अचूक थ्रोवर स्टिवन स्मिथ धावचीत झाला. मॅथ्यू वेड (13 धावा), पॅमरून ग्रीन (0) व कर्णधार टीम पेन (1 धाव) यांच्यासह तळाच्या फलंदाजांनाही अपयशाचा सामना करावा लागला. हिंदुस्थानकडून डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजा याने 62 धावा देत चार फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

 

आपली प्रतिक्रिया द्या