महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तिसरी वेळ, यापूर्वी कधी असं घडलंय…

81598

महाराष्ट्रात राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत कोणताच पक्ष बहुमत सिद्ध करू न शकल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ही तिसरी वेळ आहे. दोनवेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. 1978 आणि 2014 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, राज्यपालांच्या शिफारसीवर राष्ट्रपतींची मोहोर

पहिल्यांदा 1980 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचे सरकार राज्यात स्थापन झाले होते. हे सरकार बरखास्त करून तेव्हा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे 17 फेब्रुवारी ते 9 जून 1980 या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची प्रक्रिया काय आहे? वाचा सविस्तर…

1980 नंतर तब्बल 34 वर्षांनी अर्थात 2014 साली राज्यात दुसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. ही राष्ट्रपती राजवट 32 दिवसांसाठी होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळले होतं व त्यानंतर 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 यादरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या