
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या अंतिम वर्षाच्या मे 2021 मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या विज्ञान शाखेचा तृतीय वर्ष बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स सत्र-6 या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल 84.23 टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत एकूण 3 हजार 024 विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला 3 हजार 767 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 हजार 758 एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते, तर 9 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत 43 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 2021 च्या उन्हाळी सत्राचे कालपर्यंत विद्यापीठाने 81 निकाल जाहीर केले आहेत.

























































