
सणासुदीचे दिवस आल्यावर आपण पार्लरमध्ये जाऊन शरीराचे लाड पुरवून घेतो. परंतु आपण घरीही आपल्या शरीराचे लाड पुरवू शकतो. हे लाड पुरवताना खर्चही फारसा येणार नाही. शिवाय आपल्या त्वचेसाठी सुद्धा उत्तम असेल. आपल्या प्रत्येकाला त्वचा चमकदार आणि ताजीतवानी दिसावी असे वाटते.
पिकलेले केस होतील काळे कुळकुळीत, चहापावडरमध्ये फक्त 5 रुपयांचा हा घटक घाला, वाचा सविस्तर
घरगुती बाॅडी मास्क कसा बनवाल?
बेसन – ३ चमचे.
मुलतानी माती – १ चमचे.
लिंबाचा रस – काही थेंब.
नारळ तेल – १ चमचे.
कॉफी पावडर – २ चमचे.
दही – ६-७ चमचे.
सर्व साहित्य एका भांड्यात ठेवा आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा.
ही पेस्ट तुमच्या संपूर्ण शरीरावर १० मिनिटे हळूवारपणे घासून घ्या. नंतर, कोमट पाण्याने आंघोळ करा.
एरंडेल तेल की खोबरेल तेल? त्वचेसाठी कोणते तेल सर्वात उत्तम, वाचा
बाॅडी मास्क लावण्याचे फायदे
यामुळे काखेचा काळसरपणा कमी होईल.
शरीराची दुर्गंधी कमी होईल.
मृत पेशी आणि मुरुमे दूर होतील.
हरभऱ्याचे पीठ त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करते. तसेच यामुळे त्वचेला मुलायमपणा देखील येतो. तसेच मुलतानी माती आपल्या त्वचेवर लावल्याने, त्वचेला घट्टपणा येतो. कॉफी पावडर त्वचेचे रक्ताभिसरण वाढवते आणि त्वचा चमकदार ठेवण्यास मदत होते. लिंबाचा रस हा आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो. यामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होते.
तुमच्या किचनमधील ‘ही’ वस्तू सौंदर्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही, वाचा
बॉडी टॅन काढण्याचा नैसर्गिक मार्ग
सणासुदीच्या काळात पार्लरमध्ये न जाता बॉडी टॅन कसा काढायचा याचा विचार करत असाल, तर हा घरगुती मास्क सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. आठवड्यातून दोनदा नियमितपणे वापरल्याने त्वचा स्वच्छ आणि चमकदार होईल.