वजन कमी करण्यासाठी या भाकरीचा आहारात समावेश करायलाच हवा, वाचा

चपाती की भाकरी असा प्रश्न वजन कमी करणाऱ्या प्रत्येकाला पडतो. चपातीपेक्षा भाकरी ही पचनासाठी सुलभ असते. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी भाकरी खाण्याचा सल्ला हा दिला जातो. चपाती करताना तेलाचा वापर हा बऱ्यापैकी होतो, तेच भाकरी करताना मात्र तेल लागत नसल्यामुळे वजन कमी करण्यासाठी भाकरी ही सर्वात उपयुक्त मानली जाते.

काही पदार्थ हे गरम असतानाच का खायला हवेत, वाचा

वजन कमी करण्याचा विचार केला तर गव्हाच्या पिठाची चपाती कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण गव्हाच्या पिठात फायबर आणि इतर पोषक तत्वांचे प्रमाण चांगले असते, परंतु त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. तसेच काही लोकांना गव्हाची अ‍ॅलर्जी असते.

वजन कमी करण्यासाठी ज्वारी आणि मक्याची भाकरी मोठ्या प्रमाणात खातात, कारण सामान्यतः गव्हाच्या पिठाच्या चपात्यांपेक्षा या भाकऱ्या जास्त फायदेशीर मानल्या जातात. तसेच त्यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज कमी असतात.

वाढते वजन ही अलिकडे सर्वांसाठी डोकेदुखी झालेली आहे. खासकरून तरुणांमध्ये वजन वाढण्याचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी वजन कमी करण्यासाठी आपण अनेकदा डाएटचा पर्याय स्विकारतो. परंतु डाएटिंगपेक्षा घरातील काही महत्त्वाचे अन्नपदार्थ हे वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात.

चेहरा सुंदर दिसण्यासाठी हे फूल वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

वजन कमी कमी करण्यासाठी खूप प्रकारची विविध डाएट करण्यापेक्षा योग्य आहार घेणे हे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी काहीच न खाण्यापेक्षा जे खातोय ते योग्य खातोय का हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आपला आहार आणि इतर सर्व सवयीही बदलत चालल्या आहेत. यामुळे आपल्या वजनावर फार मोठा परीणाम होऊ लागलेला आहे. सध्या कुमारवयीन मुलांपासुन ते सर्वांचेच वजन वाढु लागलेलं आहे. वजनवाढीची ही समस्या सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावु लागली आहे.

100 ग्रॅम ज्वारीच्या पिठाबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 9.7 ग्रॅम फायबर, 72 ग्रॅम कार्ब्स आणि 360 कॅलरीज असतात.

मुख्य म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी या पीठांमध्ये फायबरचे प्रमाण हे खूप असते. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी या पीठांची भाकरी ही उत्तम मानली जाते.

चेहरा सुंदर दिसण्यासाठी नानाविध उपाय करुन थकलात, आता वापरा या डाळीचे पीठ, रिझल्ट पाहून थक्क व्हाल

दोन धान्यांचे पीठ एकत्र करुन भाकरी करणे हे कायम हितावह असते. त्यामुळे आपल्याला दोन्ही पीठांच्या पोषक तत्वाचा लाभ मिळतो.