मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहावे – देवेंद्र फडणवीस

20588

सध्याचा काळ हा फार कठीण आहे. राज्यासह  देशात सर्वत्र कोरोना महामारीचा फैलाव  वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. ही वेळ राजकारण करण्याची किंवा वाद-विवाद घालण्याची नाही तर कोरोनाशी लढण्याची आहे, असे आवाहन  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पनवेल आणि नवी मुंबई शहरांना भेट देऊन दोन्ही महापालिकेच्या आयुक्तांची सविस्तर चर्चा केली आणि कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. वाशी येथील कोव्हीड सेंटरचीही त्यांनी पाहणी केली आणि महापालिकेकडून रुग्णांना कोणत्या  सेवा सुविधा दिल्या जात आहेत त्याची माहिती घेतली . यावेळी  पत्रकारांनी त्यांना महाआघाडी सरकारमधील मतभेदांबाबत विचारले  असता, ते म्हणाले की सध्याची परिस्थिती फार कठीण आहे. या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी आणि विशेष करून महाआघाडी सरकार मधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खंबीरपणे साथ देणे आवश्यक आहे. सर्वच पक्षांशी  समन्वय साधण्याकरता सरकारने एक यंत्रणाही  उभी करण्याची  आहे. या संकटामध्ये आम्ही सरकारला मदत करत आहोत, असेही ते या वेळी म्हणाले

आपली प्रतिक्रिया द्या