Skin Care – चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी ‘ही’ वस्तू लावा, वाचा

चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण नानाविध प्रयोग करत असतो. परंतु अनेकदा प्रयोग फसल्यावर, आपल्या चेहऱ्याचेही नुकसान होते. त्यापेक्षा चेहऱ्यावर तेज येण्यासाठी साधा सोपा घरगुती उपाय करुन बघा. या उपायाने तुमच्या खिशालाही ताण पडणार नाही, शिवाय हमखास फायदाही मिळेल. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुरटीचा वापर हा काही ना काही कारणांसाठी होत असतो. तुरटीचा वापर प्रामुख्याने पाणी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. परंतु केवळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी मर्यादीत नाही. तर तुरटीचा वापर हा खूप गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे, तुरटीचा वापर आपल्या घरात शतकानुशतके केला जात आहे.

Beauty Tips- रात्री झोपताना चेहऱ्याला ‘हे’ तेल लावल्याने मिळतील खूप सारे फायदे, वाचा

रात्री योग्यरित्या तुरटी वापरायची असेल तर प्रथम तुमचे तोंड पाण्याने ओले करा आणि नंतर 5 मिनिटे त्वचेवर तुरटी घासत रहा. डोळे आणि ओठ टाळून ते चोळा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

चेहऱ्यावर तुरटी घासताना, तुम्हाला विशेषतः तुमचे डोळे आणि ओठांचे संरक्षण करावे लागेल. तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे किंवा कोणत्याही प्रकारची जखम किंवा ओरखडे असतील तर तुरटीमुळे जळजळ होऊ शकते, परंतु ते त्यांच्यावर पूर्णपणे सुरक्षित मानले जाते.

Skin Care – चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी करुन बघा हे साधेसोपे परीणामकारक उपाय

कधी दुखापत झाल्यास रक्तप्रवाह थांबवण्यासाठी, तर कधी पावसात पायाचा संसर्ग कमी करण्यासाठी. दाढी केल्यावर अँटीसेप्टिक म्हणूनही चेहऱ्यावर लावले जाते.

तुरटी कधीही वापरता येते, परंतु रात्री वापरल्याने त्यातील विशेष घटक रात्रभर त्वचेवर काम करतात. यामुळे तुमची त्वचा दिवसभर ताजी राहते, हरवलेली नैसर्गिक चमक परत येऊ लागते आणि पिंपल्स इत्यादी होण्याचा धोकाही बऱ्याच प्रमाणात कमी होतो.