
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, देशात एका ठिकाणी होळी साजरी होत नाही. त्याकाळी इंग्रजांनी काढलेल्या एका फर्मानाचा निषेध करण्यासाठी ही प्रथा सुरू झाली होती. ती आजपर्यंत कायम आहे. झाशीमध्ये होळीचा सण साजरा केला जात नाही. राणी लक्ष्मीबाई यांनी दत्तक घेतलेल्या मुलाला दामोदरराव याला झाशीचा उत्तराधिकारी मानण्यास ब्रिटीशांनी नकार दिला होता. त्यांना उत्तराधिकारी म्हणून नाकारण्याचे फर्मान ब्रिटीशांनी होळीच्या दिवशीच काढले होते. त्यामुळे राणी लक्ष्मीबाई आणि झाशीतील नागरिकांनी या फर्मानाचा निषेध करण्यासाठी होळी साजरी केली नाही. ही प्रथा आजही कायम आहे.
21 नोव्हेंबर 1853 मध्ये झाशीचे राजे गंगाधरराव यांच्या निधनानंतर राणी लक्ष्मीबाई यांनी सत्तेची सूत्र हाती घेतली. गंगाधरराव यांनी मृत्यूपूर्वी दामोदरराव या मुलाला दत्तक घेतले होते आणि त्याला उत्तराधिकारी घोषित केले होते. मात्र, इंग्रजांनी दामोदरराव यांना उत्तराधिकारी मानण्यास नकार दिला आणि त्याबाबतचे फर्मान काढले. त्यांनी फर्मान काढले तो होळीचा दिवस होता. त्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांच्यासह झाशीतील नागरिकांनी होळी साजरी केली नाही. तीच प्रथा आजही कायम आहे.
झाशीमध्ये होळी साजरी करण्याची तयारी जोरात सुरू होती. त्याचवेळी ब्रिटीशांनी फर्मान जारी केले. ब्रिटीशांच्या या फर्मानामुळे झाशीची जनता शोकसागरात बुडाली. राणी लक्ष्मीबाई यांनी किल्ला सोडला आणि त्या दुसऱ्या महालात राहायला गेल्या. त्या दुःखात त्यांनी आणि झाशीतील नागरिकांनी होळी साजरी केली नाही. आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ब्रिटीशांच्या फर्मानाचा निषेध आणि राणी लक्ष्मीबाई यांनी किल्ला सोडल्याचे दुःख व्यक्त करण्यासाठी झाशीत आजही होळी साजरी केली जात नाही.





























































