पुलावरून उडी मारून प्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या

50

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

थोर या हॉलिवूडमधील गाजलेल्या चित्रपटातील अभिनेता इसाक कैपी याने पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अॅरिजोना येथील फ्लॅगस्टाफ जवळील पुलावरून त्याने उडी मारली असून यात त्याचा जागीच मृत्यू झाला. इसाकने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आत्महत्या केली आहे.

isak-happy

इसाक याची थोर या चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती. त्या व्यतिरिक्तही त्याने अनेक चित्रपट केले आहेत. या वर्षी आलेल्या फॅनबॉईज या चित्रपटातीही त्याने महत्त्वाची भूमिका निभावली होती. इसाकला दारू व अमली पदार्थांचे व्यसन देखील होते. इसाकने शेअर केलेल्या पोस्टनुसार, ‘गेल्या काही दिवसांपासून मी आत्मचिंतन करत आहे. मी स्वत:ला एक चांगला व्यक्ती समजत होतो. मात्र मी एक चांगला व्यक्ती नाही. कदाचित मी आयुष्यभर एक वाईट व्यक्तीच राहणार आहे’, असे या पोस्टमध्ये इसाकने लिहले आहे. तसेच पोस्टमध्ये त्याने जीजस क्राईस्ट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्या कुणाला त्याने दुखावले आहे त्या सर्वांची माफी देखील मागितली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या