हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्यांनी आहारात हा पदार्थ समाविष्ट करायलाच हवा

आपल्या स्वयंपाकघरात अशा काही भाज्या असतात, ज्या त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांमुळेही खास मानल्या जातात. अशीच एक भाजी म्हणजे बीटरूट. बीट आपल्या शरीराला आतून बळकटी देण्यास मदत करते.

बीटरूटमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यास मदत करते. म्हणूनच अशक्तपणाने ग्रस्त असलेल्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

मधुमेहींनी आहारात कोणत्या भाज्या खायला हव्यात, जाणून घ्या

बीटरूटचे नियमित सेवन हृदयाच्या स्नायूंना बळकटी देते आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक सारख्या आजारांची शक्यता कमी करते.

बीटरूटमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते, जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते आणि पचन निरोगी ठेवते.

बीटरूटमधील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेला चमकदार बनवतात, तर ते केसांची मुळे देखील मजबूत करतात.

रोज किमान एक चमचा जवस का खायला हवेत, जाणून घ्या

 

बीटरूट कसे खावे?

बीटरूट कच्चे सॅलडमध्ये घालून खाऊ शकता.

बीटाचा रसही सकाळी रिकाम्या पोटी घेणे फायदेशीर आहे.

हिवाळ्यात मखाना खाण्याचे अगणित फायदे, वाचा

भाज्या किंवा सूपमध्ये घालून देखील सेवन केले जाऊ शकते

बीटरूट ही केवळ रंगीत भाजी नाही तर एक नैसर्गिक औषध आहे. ते शरीराच्या अनेक भागांना बळकटी देते आणि त्यांना दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करते. जर ते नियमित आहारात संतुलित प्रमाणात समाविष्ट केले तर अनेक आजारांपासून बचाव शक्य आहे.