राजा ढाले अनंतात विलीन

49

सामना प्रतिनिधी । मुंबई

दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी विचारवंत आणि बंडखोर लेखक राजा ढाले यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी दादर येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजा ढाले यांचे मंगळवारी विक्रोळी येथील घरी हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालयात नेण्यात आले होते. आज दुपारी 12 वाजता विक्रोळीतील निवासस्थानापासून सुरू झालेली अंत्ययात्रा दुपारी 4 वाजता दादर चैत्यभूमी येथील स्मशानभूमीत पोहोचली. तिथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ लेखक ज. वि. पवार यांनी आदरांजली वाहिली. जोगेंद्र कवाडे, कपिल पाटील, अविनाश महातेकर, सुमंत गायकवाड, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, अर्जुन डांगळे, सुनील दिघे, एकनाथ गायकवाड, येशू पाटील, गौतमीपुत्र कांबळे, अरुण कांबळे, मधू कांबळे, सुबोध मोरे, सुमेध जाधव, धम्मसंगिनी रमा गोरख, डॉ. राजीव वाघमारे आदी राजकीय व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी ढाले यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या निधनाने दलित पँथर चळवळ धगधगती ठेवणारा एक निखारा विझल्याचे आणि आंबेडकरी चळवळ धगधगती ठेवणारा लढवय्या महानायक हरपल्याची शोकभावना उपस्थितांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या