
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा कॉल आला आहे. कॉलरने शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आझमी यांच्या खासगी सचिवाने दिलेल्या तक्रारीवरून कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद कमाल हुसैन (40) हे अबू आझमी यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहतात. हुसैन यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून आझमी यांनी शिवीगाळ करत अपशब्द वापरले. तसेच आझमी यांना उडवून टाकणार, कापून टाकणार अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे हुसैन यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुलाबा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































