सांगली बाजार समितीसाठी पहिल्या दिवशी तीन अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यातील सात बाजार समित्यांचे धुमशान सोमवारपासून सुरू झाले. सांगली बाजार समितीसाठी पहिल्या दिवशी तीन अर्ज दाखल झाले. याशिवाय 115 अर्जांची विक्री झाली.

बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांची नियुक्ती सहकार विभागाने केली आहे. बाजार समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, दि. 27 मार्च ते 3 एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी तीन अर्ज प्राप्त झाले आहेत. सोसायटी गटातून दोन आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला.