
सामना प्रतिनिधी । नगर
रात्रीच्या सुमारास मोटरसायकलस्वारांना अडवून लूटणारी तसेच घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाख्याच्या पोलिसांनी जेरबंद केली आहे. आरोपीमध्ये लखन मच्छिंद्र पिटेकर (वय 20, रा.भेंडा खुर्द, ), सागर कर्डिले (रा.गेवराई),सागर चौक यांचा समावेश आहे. त्यांनी मिळून गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. योगेश गुंजाळ (रा.भेंडा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच सागर कर्डिले याचा शोध घेतला असता तो पसार झाला आहे. आरोपींकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर पंढरीनाथ फुलारी (वय 28,रा.फुलारी वस्ती,भेंडा, नेवासा) यांच्या 9 फेब्रुवारी रोजी रात्री 11.50 वाजता बंद मोबाईल शॉपीचा पत्रा कशानेतरी कापुन उचकटुन आत प्रवेश करुन आरोपींनी मोबाईल शॉपीमधील अॅसेसरीच चोरुन नेल्या होत्या. घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरुन पोलिसांनी शोध घेत आरोपीपर्यंत पोहचले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन खंडागळे, योगेश गोसावी, मल्लीकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रविंद्र कर्डिले, विशाल दळवी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, बबन बेरड यांनी तपास करुन आरोपींना जेरबंद केले.























































